🕒 1 min read
मुंबई: भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले असून याबाबतीत त्यांनी माफीही मागितली आहे. आता यावरच राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे. आपल्या संविधानात प्रत्येक धर्माचा मान राखावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माबाबत कोणीही अद्वातद्वा बोलू नये.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal यांनी व्यक्त केले. pic.twitter.com/O3gSAtNTKf
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 8, 2022
तसेच एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याची शिक्षा विदेशात राहणाऱ्या वा विदेशात आपले उत्पादन विकणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना मिळू नये, त्यांना त्रास होऊ नये. एखाद्या पक्षातील माथेफिरू लोक केवळ प्रसिद्धीसाठी अशी चुकीची वक्तव्ये करतात. भारत सरकार मुस्लिम देश, मुस्लिम संघटना यांच्याशी चर्चा करून मार्ग काढेल अशी आशा वाटते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सोनियांच्या चरणी आणि पवारांच्या खांद्यावर…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- बीसीसीआय आयपीएलचे मीडिया ब्रॉडकास्ट राईट्स विकणार; याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…!
- “…तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते”, छगन भुजबळ यांचे वक्तव्य
- Rajya Sabha Election : “…त्यामुळे आमचा विजय आणखी सोपा होणार”, आशिष शेलार यांचे मोठे वक्तव्य
- भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर, चंद्रकांत पाटील म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
