🕒 1 min read
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जून २०२२ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यावरून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे.
“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्रास देण्याच्या भूमिका घेत आहेत”, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला कळेल –
राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे – प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले आहे असा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर आणि बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल. कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला कळेल”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
