Share

केकेच्या निधनावर पोलिसांचं स्पष्टीकरण ; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी आज (४ जून) प्रसिद्ध गायक केके यांच्या मृत्यूसंदर्भात महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले.

“बुधवारी (१ जून) केके यांचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जागेची कमतरता नव्हती आणि तेथे एसीही योग्यरित्या सुरू होता. कार्यक्रमाच्या स्थळी काही प्रमाणात गर्दी असू शकते, परंतु जागेची कमतरता होती किंवा त्यांना घाम येत आहे किंवा(इतर लोकांना त्रास होत होता अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. केके त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी 6:22 वाजता पोहोचले आणि 7:05 वाजता ते मंचावर पोहोचले. त्यांच्या जवळ गर्दीही जमा नव्हती, त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते,” असे पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी सांगितलं.

मात्र, त्यावेळी कार्यक्रमस्थळी किती लोक होते? यावरून वाद निर्माण होत असल्याचे गोयल म्हणाले, ”पोलिसांकडे स्पष्ट व्हिडिओ आहे, तुम्ही लोक आरामात उभे राहून नाचत असलेले पाहू शकता. त्याठिकाणी कोणत्याही वेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती नव्हती आणि जेव्हा कार्यक्रमाचा व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलमधून पाहिला गेला तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी जागाही उपलब्ध होती,” असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!