🕒 1 min read
मुंबई: केंद्र सरकारने इंधनावरील कर कपातीचा निर्णय घेतला आहे. कर कपातीनंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून भाजपकडून आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
“गॅस सिलेंडर कमरेला बांधा, डिझेल-पेट्रोल काखेत घ्या.. महविकास आघाडीवाल्यांनो जरा कांद्याचा ज्यूस प्या. केंद्र सरकारनं घेतलेला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह. पण आमची वसुली चालूच राहील हा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला आहे.”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
गॅस सिलेंडर कमरेला बांधा
डिझेल पेट्रोल काखेत घ्या
महविकास आघाडीवाल्यांनो
जरा कांद्याचा ज्यूस प्या…केंद्र सरकारनं घेतलेला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह.
पण आमची वसुली चालूच राहील हा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतलेला आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 22, 2022
दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून कपात होऊन डिझेलचे भाव प्रति लिटर 89.62 झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून आता ठाकरे सरकारवर इंधनदरवरून टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मनसेत काही पार्ट टाईम जॉबवाले आहेत, त्यांच्याकडून…” ; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी वसंत मोरेंचा गौप्यस्फोट
- ‘भूल भुलैया २’ जोरात, ‘धाकड’ची परिस्थिती ‘बिकट’! कंगना म्हणाली…
- Raj Thackeray : सभेपूर्वी पुण्यात वसंत मोरेंची बाईक रॅली
- झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा ‘बिग ब्लास्ट’
- पुण्यात राज ठाकरेंची आज सभा होणार; स्थानिक पोलिसांनी घातल्या ‘या’ अटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
