Share

‘भूल भुलैया २’ जोरात, ‘धाकड’ची परिस्थिती ‘बिकट’! कंगना म्हणाली…

Published On: 

मुंबई :   प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली होती. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही त्याचा वेग कायम राहिला. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यानुसार ‘भूल भुलैया २’ चित्रपटाने २८ टक्क्यांहून अधिक व्यवसायात झेप घेतली आहे. याचवेळी कंगनाचा ‘धाकड’ या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये दुसऱ्याच दिवशी घसरण सुरु झाली आहे.

‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन पाहता कंगनाने कार्तिक आर्यनचे अभिनंदन केले आणि आपला पराभव स्वीकारला. कंगनाचा हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील फ्लॉप चित्रपटांमध्ये सामील होताना दिसत आहे. ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाने शुक्रवारच्या आकडेवारीनुसार १४.११ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यात ५० कोटींची कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरवातीच्या आकडेवाडीनुसार ‘भूल भुलैया २’ चित्रपटाची एकूण कमाई २१.१० कोटी रुपये आहे. या चित्रपटाने दोन दिवसात ३१.११ कोटींची कमाई केली असून पहिल्या दिवशी १४.११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे रविवारचे कलेक्शन २० कोटींपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. कंगनाच्या धाकड चित्रपटाची अवस्था बिकट आहे. धाकड चित्रपटाने शनिवारी फक्त १.०५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसात फक्त २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंगनाचा चित्रपट फ्लॉप चित्रपट यादीत समाविष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!