पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेपूर्वी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत प्रचंड टीका केली आहे. आता या टीकेचा समाचार राज ठाकरे घेणार का, याकडे सर्वांच्या नजर असतील. दरम्यान राज ठाकरेंच्या सभेच्या आदल्या दिवशी वसंत मोरेंनी काही मनसे नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गौप्यस्फोट केला आहे.
वसंत मोरे म्हणाले, “मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कोण यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत”.
पुढे बोलताना वसंत मोरे यांनी पक्षातील वादावर आपली भूमिका मांडली आहे. म्हणाले, “असं बोललं जातंय की वसंत मोरे निवडणुकीपूर्वी कांड करणार आहे. मी काय कांड करणार? मला कांड करायचा असता, तर कधीच केला असता. हे कुणीतरी पसरवतंय. मनसेत काही पार्ट टाईम जॉबवाले आहेत, त्यांच्याकडून माझ्या आणि माझ्या समर्थकांविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. मनसे कार्यकर्त्यांना मी आवाहन केलंय की तुम्ही यांना फोडून काढा. पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

