🕒 1 min read
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे.
वसंत मोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी कात्रज परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष यांच्याबद्दलच्या अफवांमुळे वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाले. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. मात्र, त्यानंतर निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. निलेश माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची इतकी घाई कोणाला झाली होती, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे केला आहे.
https://fb.watch/d9tDaVk4fB/
दरम्यान राज ठाकरेंनी भोंगेविरोधी भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे पक्षात नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी उघड बोलूनही दाखवली आहे. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना त्यांना आमंत्रण दिलं जात नाही, त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत छापलं जात नाही. असा आरोप स्वत: वसंत मोरे यांनी केला आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे वेळ देऊन मुंबईकडे रवाना झाल्याने अनेक चर्चांना उधान आले होते. यावरच बोट ठेवत शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का, हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही! असा टोला मनसेला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : पुण्यात आज ‘राज’गर्जना; ; ‘या’ टीकेचा घेणार का समाचार?
- IPL 2022 DC vs MI : मुंबईने केला दिल्लीचा खेळ खल्लास! बंगळूरू आरामात प्लेऑफमध्ये; वाचा!
- IPL 2022 DC vs MI : बुमराहच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज संथगतीने धावले, मुंबईला १५९ धावांचे लक्ष्य
- अभिनेते मोहनलाल चित्रपटातूनच नाही तर व्यवसायातून देखील कमवतात करोडो रुपये
- “ते भाजपात आहेत की आणखी कुठे…”; धनंजय मुंडेंचा सदाभाऊ खोत यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
