Share

Raj Thackeray : सभेपूर्वी पुण्यात वसंत मोरेंची बाईक रॅली

Published On: 

🕒 1 min read

पुणे: थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी बाईक रॅली काढत मनसेच्या बिग-शोची झलक दाखवून दिली आहे.

या रॅलीत अनेक महिलांचाही समावेश आहे. मनसेचा ताफा बाईकवरून सभेच्या ठिकाणी निघाला आहे. मात्र काल रात्रीच वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह करत पुहा एकदा मनातील खळखळ बोलून दाखवली होती. माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे.

वसंत मोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी कात्रज परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष यांच्याबद्दलच्या अफवांमुळे वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाले. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. मात्र, त्यानंतर निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. निलेश माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची इतकी घाई कोणाला झाली होती, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे केला आहे. दरम्यान काहीच वेळात राज ठाकरे यांची तोफ धडकणार असून राज ठाकरे काय बोलतात, काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!