🕒 1 min read
मुंबई: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत कडाडून विरोधही केला. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा राज ठाकरेंना इशारा दिला आहे.
राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही. आजच्या बैठकीला ५० हजार लोकं उपस्थित राहतील. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही असा इशारा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे.
मागे हटणार नाही, आंदोलनावर ठाम –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. “राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
