🕒 1 min read
मुंबई : सर्वांचा लाडका साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा याला सर्वाधिक ओळख अर्जुन रेड्डी या चित्रपटातून मिळाले. तो आज ३३ वर्षाचा झाला आहे. या अभिनेत्याने ११ वर्षांच्या करिअर मध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पाहिलं तर तो खूप मनोरंजक आहे. विजयकडे आज करोडोची संपत्ती आहे. पहिल्यांदा तो भाड्याच्या घरात राहत होता. एकवेळ अशी होती त्याच्याकडे भाडे भरायला देखील पैसे नव्हते.
विजय देवराकोंडा हा त्याच्या स्टायलिश लुकमुळे अनेक लोकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. विजय त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. त्याच्या जीवनाबद्दल पाहिलं तर तो आज तब्बल ३० कोटींच्या संपतीचा मालक आहे.
विजय देवराकोंडा एका चित्रपटासाठी जवळपास ५ ते ७ कोटी घेतो. लाइगर चित्रपटासाठी त्याला २० कोटी रुपये मिळाले आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा १५ कोटी रुपयांचा अलिशान बंगला आहे. त्याला कार ची आवड असल्यामुळे त्याच्याकडे अनेक अलिशान गाड्या आहेत. विजयला अर्जुन रेड्डी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
