Share

IPL 2022 : आता मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकणार नाही सूर्यकुमार यादव! नक्की झालं काय? वाचा…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई इंडियन्स (MI) संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. विक्रमी पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई संघाला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या (MI vs KKR) मोसमातील ५६व्या सामन्यापूर्वी हा झटका बसला. सूर्यकुमार दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर पडला आहे

मुंबई इंडियन्सने सांगितल्यानुसार, ३१ वर्षीय सूर्यकुमारच्या डाव्या हातावर ताण आला असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही कोलकाताविरुद्ध नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमारच्या दुखापतीबद्दल सांगितले. रोहित म्हणाला की, सूर्यकुमार दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी रमणदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताने आज अजिंक्य रहाणे, पॅट कमिन्स, शेल्डन जॅक्सन, वरुण चक्रवर्ती आणि वेंकटेश अय्यर या पाच खेळाडूंना संधी दिली आहे. सूर्यकुमारने चालू हंगामात मुंबई इंडियन्सकडून ८ सामने खेळले आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ३०३ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!