🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात स्पर्धेचा ५६वा सामना रंगत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल दर्जाची गोलंदाजी करत १० धावांत ५ बळी घेतले आणि कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावांवर रोखले. या सामन्यात कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
कोलकाताचा डाव
अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकातासाठी ६० धावांची चांगली सलामी दिली. अय्यरने स्फोटक ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या, तर रहाणेने संयमी २५ धावा केल्या. फिरकीपटू कुमार कार्तिकेयने दोघांना बाद केले. त्यानंतर आलेला कप्तान श्रेयस अय्यर (६) मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. घातक दिसत असलेल्यास आंद्रे रसेलला जसप्रीत बुमराहने १५व्या षटकात पोलार्डकरवी झेलबाद केले. एका बाजूने किल्ला लढवत असलेला नितीश राणाही याच षटकात बाद झाला. राणाने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. बुमराहने १८व्या षटकात शेल्डन जॅक्सन (५) पॅट कमिन्स (०) आणि सुनील नरिनला (०) बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. २०व्या षटकात बुमराहने फक्त एकच धाव दिली आणि कोलकाताचा डाव २० षटकात ९ बाद १६५ धावांवर संपवला. रिंकू सिंह २ चौकार आणि एका षटकारासह २३ धावांवर नाबाद राहिला. बुमराहने ४ षटकात १ निर्धाव षटक टाकत आणि १० धावा देत ५ बळी घेतले.
Innings Break!#KKR post a total of 165/9 on the board.#MumbaiIndians chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/0TDNSwhQXs #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/OuZWq6F8zY
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
