Share

IPL 2022 SRH vs RCB : दिनेश कार्तिकच्या तुफान फटकेबाजीने अफगाण गोलंदाज हैराण..! ठोकली षटकारांची हॅट्ट्रिक; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ५४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (SRH vs RCB)शी खेळला गेला. बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात खराब झाली आणि विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तरीही संघाने १९२ धावांचा आकडा गाठला. दिनेश कार्तिक या मोसमात बंगळुरूसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. आणि या सामन्यातही त्याच्या बॅटने कमाल केली. यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ३० धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकात त्याच्या बॅटने षटकारांची हॅट्ट्रिक लगावली. त्यामुळे संघाला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली.

कार्तिकने डावाच्या शेवटच्या शतकातील तिसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीविरुद्ध मिड-विकेटवर फटका मारला. तिथे सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या राहुल त्रिपाठीच्या हातातून चेंडू निसटला आणि सीमारेषेपार गेला. पुढच्या चेंडूवर कार्तिकने लाँग ऑनवरून षटकार मारला. फारुकीने तिसरा चेंडू संथ गतीने टाकला पण कार्तिकने तोही डीप मिड-विकेटवरून सीमारेषेच्या बाहेर पाठवला.

https://twitter.com/VaishnaviS45/status/1523278494058262528

https://twitter.com/BcciHatebot/status/1523286204137218048?s=20&t=_rba_Nct7-FFCU4KUHr0tg

असा रंगला सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर (SRH vs RCB) ६७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी (८ मे) रंगेलल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत हैदराबादला १९३ धावांचे आव्हान दिले. विराट कोहली पुन्हा गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी केली आणि दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात वानिंदू हसरंगाच्या पाच बळींमुळे हैदराबाद संघ १२५ धावांत आटोपला. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतकी झुंज दिली. या विजयासह बंगळुरूने मागच्या दारुण पराभवाचा वचपा काढला आहे. हैदराबादविरुद्ध आरसीबीचा संघ ६७ धावांवर ऑलआऊट झाला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!