Share

शरद पवार आणि उदयनराजे यांची दीर्घकाळानंतर होणार भेट!

Published On: 

सातारा : उद्या दुपारी साताऱ्यातील रयत शिक्षण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी शरद पवार पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मुख्य नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये सध्या चर्चा होतेय ते म्हणजे उदयनराजे भोसले यांची. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी खास भाजपचे खासदार उदयनराजे भोसले जाणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधान आलं आहे.

शरद पवार आणि उदयनराजे भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहितीनुसार, साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे उदयनराजे भोसले हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीतील नेते आणि उदयनराजे यांच्यात संघर्ष झाल्यानंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण महाराष्ट्रात आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे उदयनराजेंना विकास कामे आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरुनच काम करावी लागणार आहेत. तसेच काही महिन्यात नगरपालिका निवडणुका होणार आहेत. यामुळे या भेटीमागे निवडणुकीची पार्श्वभूमी तर नाही न असा अंदाज वर्तविला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!