🕒 1 min read
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय दिला असून पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच तेथील बांधकाम पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘जेव्हा टक्केवारीकडे लक्ष देऊन प्रकल्प राबवले जातात, त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात’, अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
जेव्हा टक्केवारीकडे लक्ष देऊन प्रकल्प राबवले जातात, त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात… pic.twitter.com/2czh6b2iIu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 6, 2022
दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका केली असून ते म्हणाले आहे की,‘एका पोरा मुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला वाटेल तिकडे काही करत सुटला आहे ज्याची किंमत मुंबईला काही वर्षांनी भरावी लागेल. नाईट लाईफचं नाटक सुरू केलं आज ते नाटक फक्त याच्या मित्रां पुरतच मुंबईत सुरू आहे. दहा फुटाची काम करणार आणि हजार फोटो काढणार पण त्यामागे नुकसान मोठं आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- IND vs WI : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा; ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक!
- “…मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
- “एका पोरामुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला…”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- “शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून…”, अजित पवार यांचे वक्तव्य
- IPL 2022 GT vs MI : नशिबच फुटकं..! गुजरातचा फलंदाज ‘अशा’ पद्धतीनं झाला OUT; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
