🕒 1 min read
अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरचे लाऊड स्पीकर सरकारने काढले नाहीत, तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशावर अनेकांनी नाराज व्यक्त केली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावरून राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
“काही पक्षाचे नेते सांगतात, इथे असं करा, तिथे भोंगा लावा. आरं भाषण करणं सोपंय रं बाबा पण आपण काय सांगतोय, त्याचे काय परिणाम होतील, हे पण पाहिलं पाहिजे ना? आता त्यांच्याच पक्षातील नगरसेवक सांगायला लागले, आम्हाला इथे निवडून यायचंय. हे तुम्ही काय सांगताय…ही आज पुण्यात परिस्थिती आहे. समाजासमाजात ही दुही कशाकरिता..? याच्यातून आपण काय साधणार आहोत? देशाला आणि राज्याला आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत? आता कुठेतरी आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची वेळ आली की नाही?”, असे अनेक सवाल अजित पवार यांनी राज ठाकरेंना विचारले.
“मशिद, भोंगे, हनुमान चालिसा यावरती राजकारण करु पाहणाऱ्या राज ठाकरेंना बाकीचे प्रश्न नाहीत का, त्यावरती आंदोलन करा, अशी भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे? कोरोना काळात तरुणांचा रोजगार गेला, अशी कृत्य करुन तो रोजगार परत मिळणार आहे का? निवडणुकीवर डोळा ठेऊन, कुणाला तरी बरं वाटावं, म्हणून अशी भूमिका घ्यायची, तुमचं वागणंही लोकांना चांगलं कळायला लागलंय. पण तुमची अशी भूमिका शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारी नाही”, असंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
