🕒 1 min read
मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका घेतली तेव्हा प्रसारमाध्यमांकडून त्यांच्या प्रत्येक कृतीचे वार्तांकन करण्यात आले. राज ठाकरे यांची प्रसिद्धी करण्यात आली. या पाश्वर्भूमीवर अजित पवार यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, “मनसेकडून फारतर दोन दिवस आंदोलन झाले. त्याचे पुढे काहीच झाले नाही. आजपर्यंत हाती घेतलेली सगळी आंदोलनं फसलेली आहेत. राज ठाकरे यांनी आजपर्यंत जी जी आंदोलनं केली ती राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. या व्यक्तीने आजपर्यंत केलेल प्रत्येक आंदोलन हे राज्याचं नुकसान करणारं होतं”.
राज ठाकरे उत्तर भारतीय चले जाव म्हंटले होते. या बदललेल्या भूमिकेवरही अजित पवार यांनी निशाणा साधला. “राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीय चले जाव म्हटले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमधील बांधकामे बंद पडली होती. बांधकाम व्यवसायिकांना त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. आपल्याकडील लोक काही कामं करतच नाहीत. मजुरांअभावी सर्व बांधकामे ठप्प झाली होती. शेवटी ज्या व्यक्तीने उत्तर भारतीयांना चले जाव म्हटले, त्याला आपली भूमिका बदलावी लागली. राज ठाकरे यांची भूमिका कायम कुठे राहिली”? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्यानंतर “राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. फेरीवाले आणि टॅक्सीवाल्यांना मारून फुकटची प्रसिद्धी मिळते. त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. काही लोकांना अशा फुकटच्या प्रसिद्धीचा हव्यास असतो”, असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
