🕒 1 min read
मुंबई: खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून आज (५ मे) सुटका झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं काल त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे.
दरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेले जाणार आहे. सध्या त्यांचे पती आमदार रवी राणा तळोजा कारागृहात असून त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु आहे.
Navneet Rana is likely to reach Lilawati Hospital around 3pm.
I will visit lilavati hospital first.
Ravi Rana likely to be released by 4pm from Jail.@BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 5, 2022
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ते गेल्या बारा दिवसांपासून कारागृहात होते. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. आणि अनेक अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या सुटका होताच नवनीत राणा यांची रुग्णालयात भेट घेणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मर्सिडीज बेबी’ म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद! वाचा दोन्ही संघांची हेड-टू-हेड आकडेवारी
- “…या भानगडी सोडून द्या”, रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अर्जुन खोतकर यांची टीका
- IPL 2022 : बाप शेर पोरगा सव्वाशेर..! रिकी पाँटिंगच्या मुलानं ऋषभ पंतला थकवलं; पाहा VIDEO!
- “तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात…”, अजित पवारांचा अप्रत्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
