Share

‘मर्सिडीज बेबी’ म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Published On: 

मुंबई: बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा तिथे एकही शिवसैनिक नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले ते  मर्सिडीज बेबी आहेत’, अशी टीका केली होती. यावरच पुन्हा एकदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“किमान मी असा कोणता दावा तरी केला नाही की, मर्सिडीज गाडीचा शोध मी लावला किंवा मर्सिडीज मीच तयार केली. तसेच  इतिहासाचा थोडा अभ्यास केला तर कळेल की, त्याकाळी इंग्रजांवर ईडीच्या धाडी पडत नव्हत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणाच्या बाजूने होते, हे माहिती नाही.”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे ‘मर्सिडीज बेबी’ आहेत त्यांना काय माहित संघर्ष काय असतो? त्यांनी तो पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितच उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक बाबरी ढाचा पाडला तेव्हा तिथे होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

तसेच मागील जन्मामध्ये मी असेल तर १८५७ च्या युद्धामध्ये मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल तर तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे. असेही फडणवीस यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!