🕒 1 min read
मुंबई: व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) अडचणीत आले असून हिरेन यांच्या हत्याकांडात शर्मा हेच सूत्रधार असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली. तर यालाच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर (Sheetal Sheth-Devrukhkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“शिवसेना कोणालाही पाठिशी घालत नाही मग तो गंभिर गुन्ह्यातील आरोपी वाझे असो की केंद्राच्या सेवेत असलेला पोलिसांना गुंगारा देणारा परमबिर सिंग असो. तपास महाराष्ट्र पोलिसांवर सोपवा संपुर्ण सत्य बाहेर येईल. मग बघुया सन्मानाचे मानकरी कोण होतात!”, असा टोला शीतल शेठ-देवरूखकर यांनी लगावला आहे.
शिवसेना कोणालाही पाठिशी घालत नाही मग तो गंभिर गुन्ह्यातिल आरोपी वाझे असो की केंद्राच्या सेवेत असलेला पोलिसांना गुंगारा देणारा परमबिर सिंग असो ….तपास महाराष्ट्र पोलिसांवर सोपवा संपुर्ण सत्य बाहेर येईल मग बघुया सन्मानाचे मानकरी कोण होतात!
— Sheetal Swapnil Sheth (@SheetalSheth_) May 5, 2022
काय म्हणाले होते केशव उपाध्ये?
“सचिन वाझे काही लादेन आहे का? असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे. बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का? याचं उत्तर द्यावं.”, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “बाबरी पाडताना दुर्बिणीनं शोधूनही तिथे शिवसैनिक दिसला नाही”, रावसाहेब दानवेंचा टोला
- पुण्यात सरपंचावर गोळीबाराचा प्रयत्न, दगडाने ही हल्ला!
- “…हेच का तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका
- इतकी असहायता का?; ‘त्या’ हल्ल्याप्रकरणी मोहित कंबोज यांचा आयुक्त संजय पांडे यांना सवाल
- “आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…”, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
