🕒 1 min read
पुणे : एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाच्या वैमनस्यातून हडपसर मधील मांजरी येथे गावच्या सरपंचांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सरपंचांना दगड आणि विटांनी देखील जबर मारहाण करण्यात आली. यात सरपंच जखमी झाले आहेत. पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असं मांजरीच्या सरपंचांचं नाव आहे.
सरपंच धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आता नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी गावातील हॉटेल श्रीराममध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता.
भांडणानंतर आरोपी घुले याने फोन करुन आपले मित्र, साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर श्रीराम हॉटेल मधून जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण दुचाकीवर तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण गोळी धारवाडकर यांना लागली नाही. यानंतर आरोपी घुले आणि त्यांच्या साथीदारांनी धारवाडकर यांना दगड आणि विटांनी मारहाण केली.
दगड डोक्यात घालून मारहाण केल्याने सरपंच धारवाडकर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तेथे जमलेल्यां लोकांना धमकावून पळून गेले. लोकांनी धारवाडकर यांना तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
