🕒 1 min read
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज टी-२० आंतरराष्ट्रीय संघांची वार्षिक क्रमवारी (ICC T20 Rankings) जाहीर केली. या ताज्या क्रमवारीत भारतीय संघ (Team India) टी-२० मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर टीम इंडियाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. यापूर्वी, गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला होता. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा क्रिकेटमधील सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरली.
आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुष संघांच्या ताज्या क्रमवारीवर नजर टाकली, तर भारतीय संघ २७० रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचे २६५ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय पाकिस्तान २६१ गुणांसह तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका २५३ गुणांसह चौथ्या, २५१ गुणांसह ऑस्ट्रेलिया पाचव्या, २५० गुणांसह न्यूझीलंड सहाव्या, २४० गुणांसह वेस्ट इंडिज सातव्या, बांगलादेश २३३ गुणांसह आठव्या, श्रीलंका २३० गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा संघ २२६ रेटिंग गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
???? Top spot retained
???? Changes in the No.4, 5, 6 spots
???? Number of ranked teams reducedThe annual update to the @MRFWorldwide ICC Men’s T20I Team Rankings is here ????https://t.co/mxOrPyaKPz
— ICC (@ICC) May 4, 2022
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला. घरच्या मैदानावर सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरी केल्यामुळे भारताने २०२१-२२ च्या हंगामात जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० संघ म्हणून नाव कमावले आहे. परंतु आयसीसीच्या वार्षिक कसोटी क्रमवारीत ते अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा नऊ गुणांनी मागे आहे. वार्षिक क्रमवारीनुसार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानी विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
