Share

IPL 2022 SRH vs CSK : मोलाचे नव्याण्णव..! शतक हुकल्यानंतरही ऋतुराजनं केली ‘क्रिकेटच्या देवा’ची बरोबरी!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर मात (SRH vs CSK) करत स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. या विजयाचा हिरो ठरला पुणेकर ऋतुराज गायकवाड. त्याने या सामन्यात ९९ धावांची खेळी केली. त्याचे शतक हुकले असले, तरी एक मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

यासह ऋतुराज गायकवाडने आयपीएलमधील एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो सर्वात कमी ३१ डावात इथपर्यंत पोहोचला आहे. त्याने माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचीही बरोबरी केली आहे. त्याने ही कामगिरी ३१ डावातही केली. ऋतुराजचा साथीदार कॉनवेने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या चालू मोसमातील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. त्याचवेळी ऋतुराजने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२२मध्ये प्रथमच कर्णधार बनला आहे. टी-२० लीगचा १५वा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने कर्णधारपद सोडले. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला पद मिळाले. पण यंदा संघाला ८ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकता आले. यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडले आणि संघाची कमान पुन्हा एकदा धोनीकडे आली.

असा रंगला सामना…

धोनीच्या नेतृत्वात पुन्हा खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये तिसरा विजय नोंदवला. लीगच्या ४६वा सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादला (SRH vs CSK) १३ धावांनी मात दिली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. ऋतुराज गायकवाड (९९) आणि डेव्हॉन कॉनवे (नाबाद ८५) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला २०३ धावांचे आव्हान दिले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८२ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची गाडी २० षटकात १८९ धावांपर्यंतच थांबली. हैदराबादकडून निकोलस पूरनने नाबाद ६४ धावांची झुंज दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!