🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा झंझावाती गोलंदाज उमरान मलिकने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (SRH vs CSK) मोठी कामगिरी नोंदवली. उमरानने यंदाच्या मोसमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. २२ वर्षीय जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाने १५४ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला, जो सध्याच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू आहे. उमरानने गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा विक्रमही मोडला.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ४६व्या सामन्यात उमरान मलिकने इतक्या वेगाचा चेंडू दोनदा टाकला. उमरानने चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील १०व्या षटकातील दुसरा चेंडू १५४ किमी प्रतितास वेगाने टाकला. या चेंडूवर चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चौकार मारला. त्यानंतर डावातील १९व्या षटकातील तिसरा चेंडूही त्याने याच वेगाने टाकला. यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्ट्राइकवर होता. उमरान मलिकला या सामन्यात यश मिळाले नाही. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता ४८ धावा दिल्या.
https://twitter.com/MUNNA_BHAI98/status/1520790227299999744
यापूर्वी, आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता, ज्याने या हंगामात १५३.९ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी उमरानने या मोसमात १५३.३, १५३.१ आणि १५२.९ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
Umran Malik just hit 154 km/h – the fastest ball of the tournament so far ⚡ https://t.co/G16bTnGBeX | #SRHvCSK | #IPL2022 pic.twitter.com/Gj9nR3g81s
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 1, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
