मुंबई : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,‘तुम्ही शिवसेनेला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा आम्ही मागे हटणार नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले मुख्यमंत्रीसुद्धा होऊन गेलेत, अनेकांनी आपली चांगली कामगीरी करून दाखवली पण त्याच बरोबर बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचं कौतुक अगदी सुप्रीम कोर्टापासून ते सिटी सिव्हिल कोर्ट पर्यंत केलं जात आहे.’ तसेच राज ठाकरे सुपारी बहाद्दर आहे हे जनतेला कळतंय, असेही पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, ‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो’, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करून दंगल…”; एमआयएमच्या नेत्याकडून घणाघात
- “काहीच काम नसल्याने…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ अल्टीमेटमवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय…”, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- IPL 2022 SRH vs CSK : उमरान मलिकनं टाकला यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू..! स्पीडचा VIDEO तर बघा!
- “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका


