Share

“इम्तियाज जलील यांनी आधी भोंगे हटवावे, आम्ही त्यांचा सत्कार करू” – संदीप देशपांडे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील याच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. “इम्तियाज जलील यांनी अगोदर मस्जिदवरील भोंगे काढावे, आम्ही त्यांचा सत्कार करू,” असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. इम्तियाज जलील यांनी म्हंटले होते की, “मनसे प्रमुख राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादेत रॅलीसाठी येत आहेत. मी त्यांना इफ्तारसाठी आमंत्रित करतो. आपण एकत्र बसू, यातून देशात चांगला संदेश जाईल. ९९% लोक शांतताप्रिय आहेत, फक्त १% लोक अशांतता निर्माण करतात. माझा विश्वास आहे की, अशा १ % लोकांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस सक्षम आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजाचे असोत.”, याच विधानावर देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या संदर्भात बोलताना देशपांडेंनी सांगितले की, “खासदार इम्तियाज जलील यांनी आधी मशिदीवरील भोंगे काढावे, आम्ही त्यांना पुरणपोळीचे जेवण खाऊ घालू, त्यांचा जाहीर सत्कारही करू.”

तसेच संदीप देशपांडे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना देशपांडे बोलले की, “शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे कार्यकाल संपलेले नेते असून, राज ठाकरे यांच्या वरती वक्तव्य करून अपडेट होण्याचा प्रयत्न चंद्रकांत खैरे हे करीत आहेत.”

राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेसाठी एक लाखापेक्षा जास्त नागरिक सदरील सभा ऐकण्यासाठी येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा ऐतिहासिक सभा होईल, असे वक्तव्य त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!