Share

“…याची जाणीव केंद्राला असायला हवी होती”, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांतील कोळसा साठा मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागल्याने भारनियमनाचे संकट आणखी गडद झाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘कारणे काहीही असतील, पण आज या वीज केंद्रांना कोळशाचा पुरवठा अनियमित होत आहे. तेथील कोळशाचा साठा संपत आला आहे. त्यामुळे अनेक राज्यांवर ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. असे सगळे पाणी डोक्यावरून गेल्यावर केंद्र सरकार आता कोळसा पुरवठ्यासाठी धावाधाव करीत आहे. रेल्वे खात्याने म्हणे कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मात्र त्यामुळे आठवड्याला दररोज सुमारे 16 मेल-एक्प्रेस आणि पॅसेंजर गाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेचा विचार केला तर 24 मेपर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास 670 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 500 पेक्षा जास्त फेऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आहेत. कोळसा वाहतुकीला प्राधान्य वगैरे ठीक असले तरी ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याचा’ हा उफराटा कारभार रेल्वे प्रवाशांच्या मुळावर आला आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारने म्हणे कोळसा लोडिंगचे प्रमाणही वाढवले आहे. दररोज देशभरात 400 पेक्षा जास्त गाडय़ा लोड केल्या जात आहेत. वीजनिर्मितीमध्ये आलेला अडथळा दूर व्हावा किंवा ही निर्मिती ठप्प होऊ नये यासाठी हा उपाय असला तरी आधी जखम होऊ दिली कशाला? वास्तविक, गेल्या पावसाळ्यातच अनेक कोळसा खाणीत पाणी शिरल्याने उत्खननावर परिणाम झाला आणि भविष्यातील कोळसा टंचाईचा इशारा मिळाला होता. युक्रेन-रशिया युद्ध भडकणार याची पूर्वकल्पना जगाप्रमाणे आपल्यालाही होती. डिझेलच्या दरवाढीचा फटकाही कोळसा वाहतुकीला बसणार हे उघड होते. त्यात आयात कोळशाचे भाव राज्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, याची देखील जाणीव केंद्राला असायला हवी होती. मात्र राज्यांनी कोळसा आयात करावा असे सांगून केंद्र सरकार शांत बसले’, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!