🕒 1 min read
अमरावती : बनावट दस्तऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी गंभीर आरोप प्रहार संघटनेचे नेते आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणात बच्चू कडू यांच्या विरोधात १५६/३A अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी बच्चू कडू यांनी, मी एक रुपया जरी खाल्ला असेल तर माझे हात कलम करणार, अशी उद्विग्न बच्चू कडू प्रतिक्रिया दिली आहे. अकोला न्यायालयाने दिलेला निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशी न करता अशाप्रकारे न्यायालयाने आदेश देणे चुकीचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, आम्ही वारंवार जिल्हा परिषदेकडे रस्त्याची मागणी करत होतो. पण आम्हाला रस्त्याची नावं दिली नाहीत. आमदारांनी मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीत याचा ठराव झाला. मी कोणाला फसवलं हे सिध्द होत नाही. माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल केला गेला? न्यायालय असे निर्णय देत असेल तर आम्ही न्याय कोठे मागायचा? आम्ही याचा निषेध करतो. अकोला न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे.
बच्चू कडू यांच्यावर रस्तेनिधीबाबत आर्थिक अपहार केल्याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून शासकीय निधीचा अपहर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
