🕒 1 min read
मुंबई : सध्या आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेत खेळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) झारखंडमधील वीजटंचाईमुळे खूपच नाराज आहे. सोशल मीडियावर तिने राज्यातील वीज कपातीबाबत सरकारला प्रश्न विचारला आहे. उन्हाळ्यात विजेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनाही याचा फटका बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने साक्षीही चांगलीच नाराज झाली असून तिने संताप व्यक्त केला आहे.
झारखंडमधील वीज संकटावर साक्षी धोनीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. तिने ट्वीट करून राज्यात अनेक वर्षांपासून विजेची समस्या का आहे, असा सवाल केला. तिने लिहिले, ”झारखंडचा करदाता म्हणून मला जाणून घ्यायचे आहे, की राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून वीज संकट का आहे? आम्ही जवाबदारीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न करत आहोत.”
As a tax payer of Jharkhand just want to know why is there a power crisis in Jharkhand since so many years ? We are doing our part by consciously making sure we save energy !
— Sakshi Singh ????????❤️ (@SaakshiSRawat) April 25, 2022
साक्षीच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी त्यांची अवस्थाही सांगितली आहे. एका यूजरने लिहिले, ”संपूर्ण देशात उन्हाळ्यात वीज नसते.” त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, ”तमिळनाडूमध्येही हे घडत आहे.” आणखी एका यूजरने लिहिले, ”साक्षी जी, फक्त तुम्हीच नाही तर संपूर्ण झारखंड वीज खंडित झाल्याने त्रस्त आहे.”
महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत आहे. त्याचवेळी साक्षी तिच्या कुटुंबासोबत रांचीमध्ये राहत आहे. या हंगामात धोनीऐवजी रवींद्र जडेजा संघाची चेन्नईची धुरा सांभाळत आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ८ सामने खेळले असून ६ सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
