Share

‘लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो’, गणेश नाईकांना करणी सेनेचा पाठींबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “लिव इन रिलेशनशिप यामधील नाते म्हणजे नवरा आणि बायको यासारखे नाते आहे. लिव इन रिलेशनशिपमधील नात्याला नवरा बायकोचा दर्जा असतो. लिव इन मधील नवरा बायकोचा हा दर्जा अनेक प्रकरणामध्ये न्यायालयाने न्याय निवाडा करताना स्पष्ट केला आहे. म्‍हणून भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप करने योग्य नाही. सत्तावीस वर्ष गणेश नाईक यांच्याबरोबर दीपा चौहान एकत्र राहत होत्या आणि या नात्यातून त्यांना एक मुलगा झाला आहे. गणेश नाईक यांना केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी दीपा चौहान या महिलेने तक्रार केली आहे,” असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी म्हंटले आहे.

गणेश नाईक यांच्यावर दाखल झालेले एफआयआर राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावे. गणेश नाईक यांच्यासोबत दीपा चौहान या लिव इन रिलेशनशिप सारख्या नात्यात सत्तावीस वर्ष होत्या. या नात्यातून त्यांना एक अपत्य सुद्दा झालेले आहे. यातील नाते नवरा बायको सारखे असते, त्यामुळे गणेश नाईक यांच्यावरील दाखल गुन्हा चुकीचा आहे, असेही अजय सिंह सेंगर यांनी म्हंटले आहे.

केवळ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने दीपा चौहान या महिलेने गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार नोंदवलेली आहे. त्यांच्यावरील गुन्हा हा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही अजय सिंह सेंगर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!