Share

IPL 2022 CSK vs MI : धोनीची अशी स्तुती कोणी केली नसेल..! आनंद महिंद्रा म्हणाले, “MAHINDRA शब्दात…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात (CSK vs MI) चेन्नई सुपर किंग्जचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने शेवटच्या ४ चेंडूत १६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे चाहत्यांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले. क्रिकेटविश्वात धोनी आजही उत्तम फिनिशर असल्याचे या खेळीने सिद्ध झाले. महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही धोनीची स्तुती करताना एक खास गोष्ट सांगितली आहे.

आनंद महिंद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”मला एवढेच सांगायचे आहे की, महिंद्रामध्ये (MAHINDRA) ‘माही’ (MAHI) या शब्दाची अक्षरे असल्याने मला खूप आनंद झाला आहे. धोनीने शानदार फिनिश केले.” चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती.

धोनीने गुरुवारी आयपीएल २०२२च्या ३३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. सीएसकेचा संघ १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. धोनीने उनाडकटच्या शेवटच्या षटकाच्या चार चेंडूत १६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने अवघ्या १३ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या.

https://twitter.com/msaadali89/status/1517202210278436864

धोनीने शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ आता प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्यप्राय दिसत आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सलग सात पराभवांचा सामना करावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय आहे आणि तो आयपीएलच्या इतिहासात १४व्यांदा खाते न उघडता बाद झाला आणि सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!