Share

काही जणांनी भाड्याने घंटा धारी हिंदुत्व स्वीकारले मात्र शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी आहे- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी समर्थन केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थाना समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी  दिला आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीसमोर मोठा घोळका करत जोरदार घोषणाबाजी केली. आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला आहे.

“हिंदुत्व… काही जणांनी भाड्याने घंटा धारी हिंदुत्व स्वीकारले आहे. वाजवत बसा घंटा! मात्र शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी आहे. लक्षात ठेवा! जय महाराष्ट्र!”, असा इशारा संजय राऊत यांनी ट्वीट करत दिला आहे. तसेच “Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!” असेही ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण जाम पेटताना दिसून येत आहे.

दरम्यान “कुणाच्या तरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाल सांगू नका, सरकारने काय केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे हे सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही. तुम्ही कोण आहात? काय लायकी तुमची? आम्हाला धमक्या देऊ नका. शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही. दोन दिवसांत झालेल्या घटना या फक्त शिवसैनिकांच्या मनातील भावना नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रोष आहे.”,  असा टोला संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!