🕒 1 min read
मुंबई: वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, हानिकारक वायू, सांडपाण्यामुळे दूषित होणारे जलस्रोत यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भूमीवरील नैसर्गिक जलस्रोत व साधन संपत्तीचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करूया. असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी जागतिक वसुंधरा दिनी केले आहे.
सोबतच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही “समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा… पृथ्वीने आपल्याला भरभरून दिले, आता आपली वेळ आहे तिचे संवर्धन करण्याची. पर्यावरणाचे संवर्धन ही उद्याच्या उज्वल भविष्यासाठीची मूलभूत गरज आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हा संकल्प करूया.”, असे आवाहन केले आहे.
वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, हानिकारक वायू, सांडपाण्यामुळे दूषित होणारे जलस्रोत यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भूमीवरील नैसर्गिक जलस्रोत व साधन संपत्तीचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करूया. pic.twitter.com/uFzls0FJFS
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 22, 2022
तर पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून हाच संदेश देण्यासाठी वसुंधरा दिन आपण पाळतो. चला, समृद्ध आज आणि उद्यासाठी पर्यावरण जपूया. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही म्हणूनच…”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंह धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल..! मुंबईचा सलग सातवा पराभव
- IPL 2022 MI vs CSK : चेन्नईचा चौधरी चमकला..! मुंबईचं चेन्नईला १५६ धावांचं आव्हान
- IPL 2022 MI vs CSK : महासामन्याला सुरुवात..! चेन्नईनं जिंकला टॉस; मुंबईकडून दोघांचं पदार्पण!
- “भाजपने भुंकणारे कुत्रे खूप सोडले, यामध्ये राज ठाकरे, किरीट सोमय्या…” ; शिवसेना आमदाराचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
