🕒 1 min read
मुंबई : उमरान मलिक हे नाव सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आपल्या वेगाने सगळ्यांना चकित करणाऱ्या उमरानने कोलकाताविरुद्धच्या मॅचमध्ये असे काही केले की त्याचा आदर्श आणि दक्षिण आफ्रिकेचा स्पीडस्टार डेल स्टेनला आपली खुर्ची सोडावी लागली. कोलकाताचा संघ फलंदाजी करत असताना आणि कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा चांगल्या लयीत खेळत होते. तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज केन विल्यमसनने उमरानकडे चेंडू सोपवला.
उमरान मलिक हैदराबादकडून १०वे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. शेवटच्या चेंडूवर त्याने अप्रतिम यॉर्कर टाकत कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरची दांडी उडवली. अय्यर २८ धावांवर तंबूत परतला. हा बोल्ड पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या डेल स्टेनने आनंदाने उडी घेतली आणि खुर्ची सोडून मुथय्या मुरलीधरनच्या पाठीवर थाप दिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
https://twitter.com/SumitRawat1111/status/1515033617646637059
उमरान डेल स्टेनला आपली प्रेरणा मानतो आणि सध्या हैदराबादमधून त्याच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे. अलीकडेच स्टेनने मलिकचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
