🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. एमसीए स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या पंजाबने मुंबईला १९९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. शिखर धवन, मयंक्र अगरवाल यांनी अर्धशतके ठोकत पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली.
पंजाबचा डाव
कप्तान मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबसाठी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९७ धावांची भागिदारी रचली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी मुंबईच्या सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवला. मयंकने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. फिरकीपटू मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मयंक बाद झाला. त्यानंतर धवनने अर्धशतक पूर्ण केले. जॉनी बेअरस्टोला जास्त काही करता आले नाही. स्पर्घेत चांगल्या फॉर्मात असलेल्या लियान लिव्हिंगस्टोनचा (२) बुमराहने अप्रतिम त्रिफळा उडवला. त्यानंतर जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी आक्रमक फटके खेळत संघाला दोनशे धावांच्या जवळ पोहोचवले. पंजाबने २० षटकात ५ बाद १९८ धावा केल्या. शाहरुखने ६ चेंडूत २ षटकारांसह १५ तर जितेशने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३० धावा केल्या. बेसिल थम्पीने मुंबईकडून २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing XI
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
- ‘शरद पवार हे जातीयवादी नाहीत’; रामदास आठवलेंनी शरद पवारांची केली पाठराखण
- सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही…”; प्रविण तरडेंची पोस्ट चर्चेत
- IPL 2022 : यंदा RCB जिंकणार आयपीएल ट्रॉफी? दिनेश कार्तिकनं दिलं ‘असं’ उत्तर!
- “काळजी घे, दगदग नको करु ! तब्येतीला जप”; पंकजांचा भाऊ धनंजयला धीर
- राज ठाकरे यांच्या शरद पवार नास्तिक असल्याच्या आरोपावर पवारांचे प्रत्युत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
