🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या गायब असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र आज किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तर आज सोमय्या यांनी फक्त ११ कोटी जमा झाल्याचे म्हटले आहे. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षापासून भाजपचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचा असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ५८ कोटीचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे ११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊतांचा नवा आरोप
“गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
“… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान
निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
“‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…” राष्ट्रवादीचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
