🕒 1 min read
मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली.
काल देखील या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. ‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमय्या भाग’, असे राऊत म्हणाले होते. यांनतर आता पुन्हा संजय राऊत यांनी किरीट सोमाय्यांवर निशाणा साधलाय, “बाप बेटे जेल जायेंगे, अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे” असं जोरदार ट्विट केले. या ट्विटमध्ये शायरीचा त्यांनी एक फोटो जोडला त्यात “आग लगाने वालो को कहा खबर, रुक हवाओ ने बदला तो खाक वो भी होंगे” असं लिहिलं आहे.
संजय राऊतांच्या या टीकेला भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोहित कंबोज म्हणाले, बाप बेटे जेल नहीं जायेंगे, राऊत का सपना सिर्फ़ सपना रहेगा ! लेकिन मेरा TWEET सेव कर के रखो देखो कौन जेल जाता हैं जल्द! 11 April , समय 5.54 Pm , Save My Tweet! देखते रहो! असे ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
“बाप बेटे जेल जायेंगे…”; संजय राऊत पुन्हा आक्रमक
क्रिकेटमध्ये Retired Out म्हणजे नक्की काय रे भाऊ? आणि ते Retired Hurt पेक्षा वेगळं कसं? नक्की वाचा!
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; मुंबई कोर्टानं दिला ‘असा’ निर्णय!
आयएनएस विक्रांत प्रकरण; किरीट सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला
भारत-पाकिस्तान सामने होणार? राजांच्या प्रस्तावावर ICCनं सुनावला ‘असा’ निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
