Share

“बाप बेटे जेल जायेंगे…”; संजय राऊत पुन्हा आक्रमक

Published On: 

मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली.

काल देखील या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. ‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमय्या भाग’, असे राऊत म्हणाले होते. यांनतर आता पुन्हा संजय राऊत यांनी किरीट सोमाय्यांवर निशाणा साधलाय, “बाप बेटे जेल जायेंगे, अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे” असं जोरदार ट्विट केले. या ट्विटमध्ये शायरीचा त्यांनी एक फोटो जोडला त्यात “आग लगाने वालो को कहा खबर, रुक हवाओ ने बदला तो खाक वो भी होंगे” असं लिहिलं आहे.

तसेच यांना शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात यावी असेही राऊत म्हणाले आहेत. यासह आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पैसे गोळा करण्यात आले आहे. तसेच चुकीचे काम केलं तर राजभवनांची उरली सुरली इज्जतही जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ
आयएनएस विक्रांत प्रकरण; किरीट सोमय्यांचा जमीन अर्ज फेटाळला
भारत-पाकिस्तान सामने होणार? राजांच्या प्रस्तावावर ICCनं सुनावला ‘असा’ निर्णय!
IPL 2022 : “महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईसाठी ओपनिंग करावी”, वाचा कोणी दिलंय हे मत!
“आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे…”; प्रवीण दरेकर आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!