नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दरम्यान चोख सुरक्षावावस्था करण्यात आली होती. पवारांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आहेत. पण पवारांजवळ कोणालाही जाऊ दिले जात नाही. शरद पवार हे नागपूर विमानतळावरून अमरावतीकडे रवाना झाले आहेत. नागपूर अमरावती या महामार्गावरही चोख सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे..
दोनच दिवसापूर्वी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर आंदोलकांकडून हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था चोख बजावण्यात आलेली आहे. पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांचा मेळावा हा अमरावती येथे होत आहे.
संघटनात्मक बळकटीसाठी हा दौरा महत्वाचा मानला जातो. वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार हे सुद्धा दौऱ्यासाठी निघाले आहेत. विदर्भात ६२ पैकी फक्त ६ आमदार राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद इथे वाढवता येईल, यासाठी मोठे नेते पवारासोबत या दौऱ्यात असतील. अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर पक्षासाठी, संघटनात्मक बळकटीसाठी हा दौरा महत्वाचा मानला जातो.
महत्वाच्या बातम्या :
“एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार
“त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई
“…यामागे मोठे षडयंत्र”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया
मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
