🕒 1 min read
मुंबई : तुकाई सिंचन योजना लवकरच सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात आज ऑनलाईन आढावा बैठक पार पडल्याचेही रोहित यांनी सांगितले.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची व अनेक वर्षे प्रलंबित असलेली तुकाई सिंचन योजना पुढील काही महिन्यात सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी या योजनेच्या कामाची ऑनलाइन आढावा बैठक घेतली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘यावेळी मुख्य अभियंता (पुणे), प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (नाशिक), जिल्हा जलसंधारण अधिकारी (नगर), उपविभागीय जलसंधारण अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते. यावेळी भूसंपादन, जमीन हस्तांतरण, विविध परवानग्या याचा आढावा घेऊन प्रलंबित कामं लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.’
महत्वाच्या बातम्या
- “…तरच धार्मिक तेढ वाढविणारी ‘ब्लू प्रिंट’ अपयशी ठरेल”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
- IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व
- “सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- “निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
