Share

“…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी मविआ सरकारने मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे.

“कालचा ‘सिल्व्हर ओक’ भाग त्यांनी स्क्रिप्ट केलेला नव्हता यावर लोकांनी विश्वास ठेवावा असे जर MVA ला वाटत असेल तर त्यांनी मुंबईच्या सीपींना लवकरात लवकर राजीनामा देण्यास सांगावे. कारण ते एक मोठे गुप्तचर अपयश आहे. नाहीतर ती एक चांगली स्क्रिप्ट केलेली कथा होती दुसरे काही नाही!”, असा टोला नितेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान यावरच केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “माननीय शरद पवारजी यांच्या घरावरील हल्ला समर्थनीय नाही. निश्चितच निषेधार्ह आहे, परंतु सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना ओळखणे गरजेचे आहे. त्यांच्यावर आंदोलन करण्याची आलेली वेळ व त्यात गेलेले १०० पेक्षा अधिक बळी, या घटनेचे गांभीर्य सरकारने ओळखावे आणि एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी. सुडाची कारवाई करू नये.”, असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

“निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका

IPL 2022: सलग तीन सामने गमावल्यानंतर रोहितची पलटण विराटच्या रॉयल्सचा सामना करणार; मोठ्या बदलांची शक्यता!

“काय उपयोग ५० वर्ष राजकारणात असून लोकं घरावर चप्पल…”, निलेश राणेंचा शरद पवारांना टोला

“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत…”, निलेश राणेंचा खोचक टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!