🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल (५ एप्रिल) ईडीने मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर राऊत यांनी थेट INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असे राऊत यांनी म्हटले आहे. आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनीही ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आयएनएस ‘विक्रांत’ च्या नावे जमा केलेल्या निधीचे काय झाले? शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल. भ्रष्ट किरीट सोमय्या उत्तर द्या. जनतेच्या भावनेशी खेळून जमा केलेला कोट्यवधी निधी कुठे जिरवले? स्वतःच्या बुडाखालचा अंधार बघा.”, असे ट्वीट मनीषा कायंदे यांनी केले आहे.
विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत सोमय्या यांनी भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या देशाच्या नावाने गोळा केलेले पैसे यांनी गिळले. आम्ही पुरावा दिल्यावर म्हणता हा कसला पुरावा? लोकं तुला नागडं करून मारतील.. अशा शब्दांत संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 KKR vs MI : कोण जिंकणार? मुंबईकर शास्त्री मास्तरांनी कोलकात्याला दिलं झुकतं माप; म्हणाले…
आधी झाला होता पहाटेचा शपथविधी, आता काय होणार? मोदी-पवार भेटीमुळं महाराष्ट्रात खळबळ!
पवारांनी घेतली मोदींची भेट; भातखळकर म्हणाले, “ED तपास बंद होण्याची शक्यता…”
IPL 2022 : RCB विरुद्ध युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग; पत्नी धनश्रीचं ‘क्रेझी सेलिब्रेशन’ व्हायरल!
शरद पवारांनी घेतली मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
