Share

“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त केली आहे. यावर संजय राऊत यांनी मराठी माणसाचं घर जप्त केल्याचे म्हटले होते. तर आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत याला प्रत्युत्तर दिले आहे.

“पत्रा चाळीतल्या मराठी माणसांना लुबाडून तर ही संपत्ती गोळा केली होती. तुमचा अपमान हा मराठी माणसाचा अपमान असेल तर तुमची संपत्ती ही देखील मराठी माणसाची संपत्ती असली पाहिजे. बरोबर ना संपादक महोदय!”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

अलिबागची ती जागा एक एकरही नाही. माझ्या पत्नीच्या किंवा तिच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत. त्यात ईडीला मनी लॉन्ड्रिंग दिसायला लागलं. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया जातात हे पाहिलं. आमचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते. असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या:

“ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले

“सलीमचा भोंगा बंद लवकरच जावेदचाही…”, मोहित कंबोज यांचा राऊतांवर निशाणा

“हर हर ईडी, घर घर ईडी”, सामनातून संजय राऊतांचा प्रहार

“मी डोलकर दर्याचा राजा…”, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सचिन तेंडुलकरने धरला मराठी गाण्यावर ठेका

IPL 2022 RR vs RCB : दिनेश कार्तिकनं उठवला राजस्थानचा बाजार..! वानखेडेवर बंगळुरुचा विजय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!