Share

“सलीमचा भोंगा बंद लवकरच जावेदचाही…”, मोहित कंबोज यांचा राऊतांवर निशाणा

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. यावरूनच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्वीट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.

“सलीमचा भोंगा बंद आहे, जावेदचा भोंगा लवकरच थांबेल”, असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे. यातील सलीम म्हणजेच नवाब मलिक जे सध्या ईडी कोठडीत आहेत. आणि जावेद अर्थातच संजय राऊत. भाजपने सलीम-जावेद जोडी म्हणत यांना डिवचले होते. आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी एक प्रकारे संजय राऊत यांना इशाराच दिला आहे.

दरम्यान पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. त्यातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप असून त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“हर हर ईडी, घर घर ईडी”, सामनातून संजय राऊतांचा प्रहार

“मी डोलकर दर्याचा राजा…”, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सचिन तेंडुलकरने धरला मराठी गाण्यावर ठेका

IPL 2022 RR vs RCB : दिनेश कार्तिकनं उठवला राजस्थानचा बाजार..! वानखेडेवर बंगळुरुचा विजय

“ये क्या हो गया? किधर जाऊ भाई में?” जेव्हा धोनीमुळं इशान किशन आला होता गोत्यात!

IPL 2022 RR vs RCB : बटलर-हेटमायरनं पुन्हा मैदान मारलं..! राजस्थानचं बंगळुरूला १७० धावांचं आव्हान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!