🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच ‘राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे कृपया महाराष्ट्र पेटवू नका’, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत.गॅस पेट्रोल डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत’, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, याच विषयी काल (४ एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की,‘शरद पवारांमुळे जातीपातीचे राजकारण वाढले, असे म्हटले जात आहे. मी स्वत: सुद्धा मागासवर्गीय समाजातून आलोय. आज मला पवार साहेबांसोबत काम करून ३५ वर्षे झाली. राजकीय पार्श्वभूमी नसून सुद्धा मी आज या राज्याचा गृहनिर्माण मंत्री आहे. मा. छगन भुजबळ, मा. सुनिल तटकरे आणि मा. धनंजय मुंडे आम्ही सारे मागासवर्गीय समाजातून येतो. मंडल आयोग आणताना या समाजातल्या शोषित-वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणायचे, हाच आदरणीय पवार साहेबांचा विचार होता.’
महत्वाच्या बातम्या:
- “अजान सुरु झाली अन् गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण”, व्हिडीओ व्हायरल
- बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत
- “अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “लाव रे तो व्हिडीओ आणि आता …”, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
- “शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
