🕒 1 min read
कोल्हापूर : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) अनुकूल अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचेही पवार म्हणाले आहेत.
यासंदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,‘राज ठाकरे मोदींच्या संदर्भात काय भूमिका मांडली हे महाराष्ट्राने पाहिले. त्यात काही तरी गुणात्मक बदल झालेला दिसतो. सध्या मोदीच्या बाबतची भूमिका त्यांनी आज घेतली. उद्या काय होईल सांगता येत नाही. परंतु, आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अलिकडे आपण पाहिलं आहे’, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज ठाकरेंच्या तोंडाला कुणीही मर्यादा आणू शकत नाही. उत्तर प्रदेशचे कौतुक करायला त्यांना काय दिसले मला माहीत नाही. लखीमपूरमध्ये शेतकऱ्याची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकरी वर्षवर भर बसले होते. त्यांची सोडवणूक केलं नाही. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्या उत्तर प्रदेशात घडल्या. परंतु, अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असे राज ठाकरे म्हणत असतील तर मला त्यावर भाष्य करायचं नाही.’
महत्वाच्या बातम्या
- “एकत्र बसून निर्णय घेऊ, राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू” – शरद पवार
- “मला यूपीएच्या अध्यक्षपदात काहीच रस नाही” – शरद पवार
- अभिनेत्री ‘मलायका अरोरा’चा कार अपघात; मनसेच्या नेत्याने केले रुग्णालयात दाखल
- राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा…”
- “राज ठाकरे दोन-चार महिने भूमिगत होतात आणि…”; शरद पवारांनी काढला चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
