🕒 1 min read
मुंबई : आज (२ एप्रिल) जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘सध्या महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘ही इमारत २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल.’ तसेच ही शासकीय इमारत असली तरी ती शासकीय वाटणार नाही अशा पद्धतीने याचे काम व्हावे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींनी शरद पवारांवर साधला निशाणा
- नारायण राणेंची उच्च न्यायालयाकडे FIR रद्द करण्याची मागणी!
- IPL 2022: …..अन् शाहरुख आऊट झाल्यावर श्रेयसनं केलं ‘किंग खान’ स्टाईलनं सेलिब्रेशन; पाहा VIDEO!
- “…तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल?”, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- IPL 2022 : KKRला सपोर्ट करण्यासाठी स्टॅन्डमध्ये दिसली अनन्या पांडे; सोशल मीडियावर चाहते म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
