🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मराठी भाषा भवनासाठीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेविषयी अनास्था असल्याचे म्हणत खंत व्यक्त केली. तसेच आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड असेल, तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल? असा सवालही अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “इतर भाषिक भेटतात, तेव्हा एकमेकांशी स्वत:च्या मातृभाषेत बोलतात. पण तुम्ही याचा मुंबईत अनुभव घ्या. दोन मराठी माणसं भेटली की तुम्हीच सांगा ते एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलतात? सुरुवातीला इंग्रजीत बोलतील. मग त्यांचं इंग्रजी थकतं. मग दोघंही अडखळतात. मग हिंदीवर येतात. मग हिंदीतून सुरूवात होते. त्यापेक्षा दोघांनी जर मराठीतच बोललं तर? मराठी भाषेबद्दल आपल्या मनात प्रेम नाही का? त्याबद्दल न्यूनगंड असेल, तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल?”, असा सवाल करत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली.
दरम्यान यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या मराठीचे कौतुक करत म्हटले की, उद्धवजींची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचे वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे.”
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: …..अन् शाहरुख आऊट झाल्यावर श्रेयसनं केलं ‘किंग खान’ स्टाईलनं सेलिब्रेशन; पाहा VIDEO!
नारायण राणेंची उच्च न्यायालयाकडे FIR रद्द करण्याची मागणी!
काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींनी शरद पवारांवर साधला निशाणा
“…तेव्हा कर्ते करविते देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले जाईल”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोला
खळबळजनक! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई NIA ला आला ई-मेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
