Share

काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींनी शरद पवारांवर साधला निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून भाजपा धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपाचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या ह्या वक्तव्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल शरद पवार यांनी जी माहिती दिली होती. त्या माहितीवरुन शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच प्रीती गांधी यांनी शरद पवार यांच्या २००६ साली १९९३ च्या हल्ल्यावर वक्तव्यं केलं आहे. त्यानंतर ट्वीटरवर शरद पवार यांचं नावं ट्रेंड होऊ लागलं आहे.

प्रीती गांधी काय म्हणाल्या शरद पवारांना?

प्रीती गांधी यांनी ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. हे ट्वीट करत प्रीती गांधी म्हणाल्या, “शरद पवार यांनी मुंबईच्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात १३ व्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती हेतूपूर्वक दिली होती. मुस्लीम बहूल मस्जिद बंदर भागात तेरावा स्फोट झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र, बॉम्बस्फोट झालेली १२ ठिकाणं ही हिंदू बहूल होती. यानंतर शरद पवार यांनी त्या घटनेमागे तामिळ टायगर्सचा हात असल्याचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं होतं. आता तेच शरद पवार काश्मिरी पंडितांविषयी बोलताना तो चुकीचा प्रोपोगंडा असल्याचं म्हणतात हे लज्जास्पद आहे.”

महत्वाच्या बातम्या :

“सगळ्यांनीच मन मोठं करून जगायला शिकलं पाहिजे”- विजय वडेट्टीवार
IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….
“नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये”- विजय वडेट्टीवार
IPL 2022 : जडेजाच्या CSKचं टेन्शन दूर होईना..! एक खेळाडू रुग्णालयात, तर दुसरा…
“शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या बंद कानावर पडतो का पवार साहेब?”, सदाभाऊंचा सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!