🕒 1 min read
मुंबई: १ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात कोलकाताने पंजाबचा ६ गडी राखून पराभव केला. हा सामना अतिशय चढ-उताराचा ठरला. कोलकाताची प्रथम फलंदाजी पाहता या सामन्यात पंजाब जिंकेल असा अंदाज बांधला जात होता, मात्र आंद्रे रसेलने काही वेळातच सामन्याचा मार्ग बदलला आणि सामना जिंकला. या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरचा एक सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहायला मिळाला, त्यानंतर चाहते त्याची तुलना बॉलिवूडच्या शाहरुख खानशी करताना दिसत आहेत.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचे (PBKS) सर्व दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. या खेळाडूंपैकी एक शाहरुख खान देखील आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज टीम साऊदीने खाते न उघडता बाद केले. त्यानंतर KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) संघाचा मालक आणि बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणार्या शाहरुख खानची आयकॉनिक पोज देऊन विकेट साजरी केली. हे दृश्य पाहून अय्यर शाहरुख खानची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा सगळ्यांना भास झाला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर बॉलीवूडच्या शाहरुख खानची आयकॉनिक पोज साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अय्यरचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींनी शरद पवारांवर साधला निशाणा
- “…तेव्हा कर्ते करविते देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले जाईल”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोला
- खळबळजनक! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई NIA ला आला ई-मेल
- “सगळ्यांनीच मन मोठं करून जगायला शिकलं पाहिजे”- विजय वडेट्टीवार
- IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
